हे पुस्तक खरोखरच मोलाचं आहे. यातून अफगाणिस्तानच्या एकेका समस्येचा अंदाज वाचकांना येईल
प्रमोदन मराठे यांनी ज्या पद्धतशीरपणे संशोधन केलं आहे. त्यामुळे वाचकांसमोर अफगाणिस्तानच्या परिस्थितीचं वास्तव उघडलं जातं. अफगाणिस्तानात येऊ पाहणाऱ्या गंभीर संकटाची शक्यता आणि त्याचे प्रादेशिक पडसाद हे किती चिंताजनक आहेत, यावर त्यांचे मुद्दे ज्वलंत आहेत. अमेरिकेनं अंग काढून घेतल्यावर आंतरराष्ट्रीय समूहांनी कसा हस्तक्षेप करायला हवा होता, याबद्दल त्यांची कळकळ हे दोन्ही कौतुकास्पद आहेत.......